'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
ती गेले अनेक दिवस नवनवीन फोटोशूट करत आहे. तिच्या या फोटोशूटमध्ये नेहमीच नाविन्य पाहायला मिळतंय.
आता तिनं या परफेक्ट आऊटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे.
'हॅपी माईंड हॅपी प्लेस' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
महत्वाचं म्हणजे तिनं या फोटोशूटसाठी कुठलंही मेकअप केलेलं नाही. या नो- मेकअप लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.