चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात 76 धावांची तूफानी खेळी करणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माने 9 महिन्यात दुसऱ्यांदा मोठ्या स्पर्धेचं विजेते पद मिळवलं. आयपीएलचा नवा सीझन 22 मार्चपासून सुरू होणार असून त्या आधी हिटमॅन रोहित हा पत्नी रितीका आणि लेक समायरासोबत सुट्ट्यांची मजा लुटत आहे.(photos : Instagram)
रोहित सध्या फॅमिली व्हेकेशनवर असून मालदीवमध्ये तो कुटुंबासोबत धमाल करतोय.
या सुट्टीचे खास फोटो त्याने त्याच्या अकाऊंटवर शेअर केले असून त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
Sun Sea Sand .. Just what the doctor ordered... अशी कॅप्शन लिहीत रोहितने काही सुंदर फोटो शेअर केलेत.
मालदीवमध्ये त्याचा आणि लेक समायराचाही खास बाँड दिसला. दोघांनी खूपच धमाल केलेली फोटोंमधून दिसत आहे.
स्विमिंग, पाण्यात खेळणं, वाळूत मस्ती.. रोहित आणि समायरा फूल ऑन एन्जॉय करत आहेत.
IPL पूर्वी रो-रो चा 'कूल' अंदाज अन् स्वॅग चाहत्यांनाही खूप आवडला.
फन टाईम, फॅमिली टाईम, मुंबई चा राजा ❤️❤️ असं म्हणत चाहत्यांनी त्यांचे फोटो लाईक करत कमेंट्सचा वर्षाव केलाय.