बेळगाव : गायीला कपिला, गोमाता अशी विविध नावं आहेत. अनेक घरांमध्ये आजही गायींची पूजा केली जाते.
गेल्या काही वर्षांपासून गाय चर्चेच्या विशेष केंद्रस्थानी आहे. मात्र बेळगावातील एक गाय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील देसाई इंगळी या गावात गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन झाले.
बाळाला ज्या पद्धतीने ममतेने आई जवळ घेते, त्याच पद्धतीची आकृती गायीच्या पोटावर उमटली आहे. ही आकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
गायीला गोमातेची उपमा देतात त्याच गायीच्या शरीरावर ममतेची उमटलेली ही आकृती पाहून अनेकजण भारावून जात आहेत.
देसाई इंगळी गावातील शेतकरी राहुल जाधव यांच्या घरी ही गाय असून माया ममतेचे हे दृश्य अनेकजण डोळयांत साठवून ठेवत आहेत.