Best Feature Films : शॉर्टफिल्म पाहून बनवले गेले ‘हे’ जबरदस्त चित्रपट, पाहून आजही प्रेक्षक म्हणतात व्वा!

| Updated on: May 29, 2021 | 7:08 AM

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये असे अनेक जबरदस्त चित्रपट आहेत, जे तयार करण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांचे सखोल संशोधन केले. यासाठी त्यांनी आधी शॉर्ट फिल्म पाहिल्या किंवा बनवल्या आणि नंतर चित्रपटाच्या कथेवर काम केले.

1 / 9

2 / 9
‘व्हिप्लॅश’ (Whiplash) दिग्दर्शक डॅमियन यांच्याकडे हा चित्रपट करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण दिग्दर्शकाने हार मानली नाही. निर्मात्यांचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी त्यांनी या चित्रपटाची काही दृश्ये अतिशय कमी खर्चात शूट केली आणि नंतर ती निर्मात्यांसमोर सादर केली. अनेक शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांनी या चित्रपटची शॉर्ट फिल्म दाखवली, जिथे लोकांना ती खूपच पसंत पडली. जेव्हा त्यांनी निर्मात्यांचा विश्वास जिंकला, तेव्हाच पुढे चित्रपट बनवला.  त्यानंतर त्याने 'ला ला लँड' (La La Land) बनवला आणि या चित्रपटाने ऑस्कर देखील जिंकला.

3 / 9
आयुष्मान खुरानाचा सुपरहिट चित्रपट अंधाधुन (Andhadhun) दिग्दर्शक-लेखक श्रीराम राघवन यांनी निर्मित केला होता. या चित्रपटाचे निर्माते हेमंत एम राव यांच्या सूचनेनुसार त्यांनी 2010मध्ये रिलीज झालेला ल'अकोरडेयर (द पियानो ट्यूनर) (l’Accordeur (The Piano Tuner)  हा फ्रेंच शॉर्ट फिल्म पाहिला. त्यानंतर दिग्दर्शकाला हा चित्रपट आवडला आणि त्यांनी अंधाधुंद चित्रपट बनवला. हा त्या वर्षाचा सुपरहिट चित्रपट सिद्ध झाला.

4 / 9
2005 मध्ये दिग्दर्शक जेनिफर केंटने 'मॉन्स्टर' नावाचा एक लघुपट बनवला. हा एक भयपट चित्रपट होता. त्यानंतर 2014 मध्ये यावर आधारित चित्रपट 'द बाबाडूक' (The Babadook) बनवण्यात आला जो रक भयपट होता.

5 / 9
‘येस गॉड येस’  (Yes, God, Yes) हा एक विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट 2019मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या एका लघुपटावर आधारित होता. कॅरेन मेन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित हा लघुपट होता, ज्याचा प्रीमियर 2017मध्ये झाला. त्याने सेंट लुईस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "बेस्ट शॉर्टफिल्म" पुरस्कार जिंकला.

6 / 9
‘लाइट्स आऊट’  (Lights Out) हा वेगळ्या थीमवर आधारित लघुपट होता, ज्याने अवघ्या  3 मिनिटांत सांगितले की, प्रकाश नसल्यास आपल्या आयुष्यात काय गोंधळ माजेल. ही शॉर्टफिल्म 2013 मध्ये तयार करण्यात आली होती, त्यानंतर त्याला पूर्ण चित्रपटाचे रूप देण्यात आले. हा एक भयपट होता.

7 / 9
फीचर फिल्म बनवण्यापूर्वी लेखक आणि दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी चित्रपटासाठी एक लघुपट बनवला. ज्याचे नाव होते ‘शॉर्ट टर्म 12’ (Short Term 12) . यानंतर त्याचे एका फिचर फिल्ममध्ये रूपांतर झाले. या चित्रपटामध्ये खूप भावना होत्या आणि या चित्रपटात ब्री लार्सन, कॅटलीन डेवर, लॅकीथ स्टॅनफिल्ड आणि रमी मालेक हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसले.

8 / 9
2015 साली रिलीज झालेला ‘पिक्सल्स’  (Pixels) हा चित्रपट खूपच हिट हॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट 80च्या दशकात रिलीज झालेल्या लघुपटांवर आधारित चित्रपट आहे. न्यूयॉर्क शहरातील 80 च्या व्हिडीओ गेमवर आधरित हा चित्रपट होता. त्याची वाढती लोकप्रियता पाहता अ‍ॅडम सँडलरच्या हॅपी मॅडिसन प्रॉडक्शनने त्याचे हक्क संपादन केले आणि तो प्रेक्षकांसमोर चित्रपट म्हणून सादर करण्यात आला.

9 / 9
सुजित सरकारचा ‘पिकू’ (Piku) हा लघुपटावर आधारित चित्रपट होता, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. सत्यजित रे यांनी ;पिकू’ नावाच्या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले होते. ही शॉर्ट फिल्म फ्रान्स 3 या फ्रेंच दूरचित्रवाणी वाहिनीसाठी बनवली गेली होती. हा चित्रपट ‘पिकू डायरी; नावाच्या लघुपटावर आधारित चित्रपट होता.