iQOO Z9 5G : आयक्यूच्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले मिळतो. यामध्ये 120HZ चा रिफ्रेश रेट आणि 1800 निट्सचा पीक ब्राइटनेस मिळतो. या फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP54 अशी रेटिंग देण्यात आली आहे.
iQOO Z9 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी तुम्ही 1TB पर्यंत वाढवू शकता. जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर हा फोन तुम्हाला 19,999 रुपयांत खरेदी करता येईल.
Realme Narzo 70 Pro फोन तुम्ही केवळ 18,999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाची FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेटसह 8GB LPDDDR4X रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.
Redmi Note 13 फोन तुम्हाला 19,999 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मिळतो.
Vivo T3 फोन आताच लाँच झाला आहे. यामध्ये 6.67 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन तुम्ही 19,999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेसिटी चिपसेट आणि 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज मिळते. ते 1TB पर्यंत वाढविता येते.