बाप हा बापच असतो… वडिलांना या शुभेच्छा देऊन वक्त करा मनातील भावना
प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. आई जसं आपल्या मुलांवर प्रेम करते, तसंच वडीलही आपल्या मुलांचे मित्र आणि नायक असतात, जे त्यांच्या छोट्या-छोट्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या फादर्स डे वर, हे प्रेमळ संदेश तुमच्या वडिलांना पाठवा.
-
-
बाबा, तूच आमच्या जीवनाचा खरा नायक आहेस. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
-
-
माझ्या प्रिय बाबा, तू माझ्या जीवनाचा आधार आहेस, तुझ्याशिवाय आमचे जीवन अपूर्ण आहे. फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा.
-
-
बाबा, तुमच्या प्रेमाने आणि शिस्तीने तुम्ही मला स्थिर आणि खंबीर बनवले आहे, तुमच्या विचारांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग समजला आहे. फादर्स डेच्या शुभेच्छा
-
-
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, माझे अस्तित्व फक्त तुझ्यासोबतच पूर्ण आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला फादर्स डेच्या शुभेच्छा!
-
-
तू माझ्या आयुष्याची ढाल आहेस, माझे प्रत्येक स्वप्न साकार करतोस, तू आम्हाला जगण्याचा मार्ग शिकवतोस, तुला माझे प्रेमळ वडील म्हणतात.