शहापूर भातसा धरणाचे ३ गेट उघडले, २९०० क्युसेकने विसर्ग सुरु
महेश घोलप |
Updated on: Sep 09, 2023 | 4:02 PM
शहापूर भातसा धरणाचे तीन गेट उघडल्यामळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे २९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
1 / 4
मुबंईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी १४१ मि.वाढली आहे.
2 / 4
त्यामुळे पाणी पातळी समतोल राखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आज शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करुन ५ पैकी ३ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
3 / 4
भातसा धरणात पाणी समतोल राखण्यासाठी १, ३, आणि ५ या गेट o.25 सेमी पर्यत उघडून २९०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गांवाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
4 / 4
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.