Photo : नाथ्रा येथे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा, गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
VN |
Updated on: Feb 07, 2021 | 2:41 PM
भूमिपूजन करण्यासाठी धनंजय मुंडे हे नाथ्रा येथे पोहोचले होते, यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात धनंजय मुंडे यांचं स्वागत केलं. (Bhumi Pujan ceremony by Dhananjay Munde at Nathra)
1 / 5
जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या 2.30 कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि नव्यानं सुरू करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन करण्यासाठी धनंजय मुंडे हे नाथ्रा येथे पोहोचले होते, यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात धनंजय मुंडे यांचं स्वागत केलं.
2 / 5
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी नाथ-याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील पन्नास वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथ्रा येथे बोलताना काढले.
3 / 5
जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता.
4 / 5
संपूर्ण गाव अगदी दिवाळी प्रमाणे सजलेले, रोषणाई व फटाक्यांच्या अतिषबाजीने नटलेले दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढत महिलांनी घरोघरी मुंडेंचे औक्षण करत ओवाळणी केली.
5 / 5
त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा हार घालून गावकऱ्यांनी आपल्या भूमीपुत्राचे अविस्मरणीय असे स्वागत केले.