आयपीएल 2024 मधील पहिला प्ले-ऑफमधील सामना केकेआर आणि हैदराबाद यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये केकेआरचा फॉर्म पाहता पारडं जड मानलं जात आहे. मात्र केकेआर संघासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार धोका असणार आहे. कारण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे.
केकेआर आणी हैदराबादमध्ये प्ले-ऑफमधील हा चौथा सामना असणार आहे. याआधी 2016 आणि 2018 ला दोन्ही टीम आमने सामने आल्या होत्या. यामध्ये हैदराबादने 2-1 ने बाजी मारलेली आहे. मात्र आता केकेआर मजबूत संघ आहे. पण तरीपण भुवी हा त्यांच्यासाठी काळ ठरू शकतो.
भुवनेश्वर कुमार याने नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याने 6 च्या ईकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये भुवीने आपलं घातक हत्याक यॉर्करला बनवलं आहे. आतापर्यंत त्याने 31 यॉर्कर टाकले आहेत. आजच्या सामन्यातही त्याची अशीच कामगिरी राहिली तर केकेआरसाठी चांगली गोष्ट नाही.
सनरायजर्स संघाचा स्ट्राईक बॉलर म्हणून भुवीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स आणि भुवी दोघांची जोडी विरोधकांना जखडवून ठेवते.