Bigg Boss 13 : BB शब्दातून स्पर्धकांची एंट्री, म्युझियमप्रमाणे दिसणार बिग बॉसचं घर
यंदा बिग बॉसचे शूटींग गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. बिग बॉसच्या नव्या घराचे काही फोटो (Bigg Boss 13 House) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हिंदी बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सिझन येत्या 29 सप्टेंबरला रिलीज (Bigg Boss 13 House) होणार आहे. यंदा बिग बॉसचे शूटींग गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. बिग बॉसच्या नव्या घराचे काही फोटो (Bigg Boss 13 House) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
-
यंदा बिग बॉसचे घर एखाद्या म्युझियम प्रमाणे दिसणार आहे. हा सेट उभारण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला असून 600 जणांनी यासाठी मेहनत घेतली आहे.
-
-
बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर नजर ठेवण्यासाठी 93 कॅमेरे लावण्यात आले आहेत.
-
-
बिग बॉसचा गेटच्या समोरच BB अशी दोन इंग्रजी अक्षरं लिहिली आहेत. यातून बिग बॉसचे स्पर्धक घरात एंट्री करणार आहे.
-
-
बिग बॉसच्या घरातील लिव्हींग रुम विविध रंगांनी सजवण्यात आला आहे. यात भिंतीवर पक्षी, प्राण्यांचे चित्रही रेखाटण्यात आले आहेत.
-
-
बिग बॉसच्या घरातील स्वयंपाक घराला मात्र कोणताही रंग देण्यात आलेला नाही.
-
-
स्वयंपाकघरातच जास्त खलबतं रगंतात या कारणामुळे बिग बॉसने हा ठिकाणी कोणताही रंग दिला नसल्याचे बोललं जात आहे.
-
-
घरातील बेडरुम मात्र फार छान डिझाईन करण्यात आले आहे. बेडरुमच्या भिंतीवर मैत्री, प्रेम यासह तिरस्कार करणारी काही चिन्ह लावण्यात आली आहेत.
-
-
यंदा बिग बॉसच्या घरातील बाथरुम ऐसपैस जागेत बनवण्यात आलं आहे.
-
-
विशेष म्हणजे बाथरुममध्ये गॉसिप करण्यासाठी भरपूर जागा दिली आहे.
-
-
यंदाच्या बिग बॉसमधील सर्वात थरारक जागा म्हणजे कन्फेशन रुम.
-
-
कन्फेशन रुममध्ये एका भिंतीवर आरसा लावण्यात आला असून संपूर्ण रुममध्ये 100 हून अधिक रशी लावण्यात आल्या आहे.
-
-
बिग बॉसच्या घरातील अंगणातील परिसर हा हिरवळीने सजवण्यात आला आहे.