बिरोबाच्या नावानं चांगभलं, पट्टणकोडोलीत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण, यंदाची भाकणूक काय सांगते?
हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी यंदा चांगला पाऊस पडेल, पण धान्य महाग होईल, अशी भाकणूक करण्यात आली. यावेळी भाविकांचा उत्साह आणि भंडाराच्या उधळणीमुळे पट्टणकडोली तील बीरदेव मंदिराचा परिसर भंडाऱ्यात न्हाऊन निघाला .
1 / 7
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध लोकदैवत आहेत. पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा, जेजुरीचा खंडोबा याप्रमाणं पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरोबाला देखील राज्याबाहेरुन भाविक दर्शनासाठी येत असतात. बिरुदेवाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत मोठ्या भक्तीमय वातावरणात, कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली येथिल, श्री. विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. तसेच गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या फरांडे बाबांची भाकणूकही आज झाली.
2 / 7
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशभरातील विविध भाविक-भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकडोली बिरुदेव यात्रेस आज प्रारंभ झाला आहे. आज सकाळी प्रथापरंपरेनुसार मंदिरातील विधिवत कार्यक्रमांना सुरवात झाली. मानाच्या दुधारी तलवारिंचे गावचावडीत पुजन करण्यात आले. पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरोबाची भाकणूक प्रसिद्ध आहे. यंदा चांगला पाऊस पडेल पण धान्य महाग होईल, अशी भाकणूक यंदाच्या यात्रेत करण्यात आली.
3 / 7
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकडोली येथील बिरदेव यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. भंडाऱ्याची उधळण आणि बिरोबाच्या नावानं चांगभलंचा गजर यावेळी भाविकांनी केला. ढोल आणि खैतालाच्या तालावर भाविकांनी ठेका धरला.
4 / 7
भंडाऱ्याची प्रचंड उधळण केल्यामुळे सारा आसमंत पिवळा धमक झाला होता
5 / 7
बिरोबाच्या यात्रेतील भाकणुकीवरतीच बळीराजा आपले कृषी कॅलेंडर तयार करत असतो. आणि हे कृषी कॅलेंडर डोळ्यासमोर ठेवूनच तो आपल्या शेतीवाडीचे नियोजन करतो. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. मागीलवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिरदेव यात्रा कमी लोकांमध्ये करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक आले होते.
6 / 7
हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी यंदा चांगला पाऊस पडेल, पण धान्य महाग होईल, अशी भाकणूक करण्यात आली.
7 / 7
भाविकांचा उत्साह आणि भंडाराच्या उधळणीमुळे पट्टणकडोली तील बीरदेव मंदिराचा परिसर भंडाऱ्यात न्हाऊन निघाला विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भाविक येतात. कोरोनाच्या संकटानंतर यंदा हजारो भाविकांच्या उपस्थिती विठ्ठल बिरदेवाची यात्रा पट्टणकोडोलीत पार पडली.