Birthday Special : जिम्मी शेरगिलच्या ‘लव लाईफ’चं ‘मोहब्ब्तें’ कनेक्शन
बॉलिवूडमध्ये ‘माचिस’ चित्रपटातून पाऊल ठेवणाऱ्या जिम्मी शेरगिलचा आज (3 डिसेंबर) 50 वा जन्मदिन आहे.
-
-
बॉलिवूडमध्ये ‘माचिस’ चित्रपटातून पाऊल ठेवणाऱ्या जिम्मी शेरगिलचा आज (3 डिसेंबर) 50 वा जन्मदिन आहे.
-
-
जिम्मीचा जन्म 3 डिसेंबर 1970 रोजी गोरखपूरमध्ये झाला होता. जिम्मीने मोहब्बतें, दिल है तुम्हारा, मुन्ना भाई एमबीबीएस, तनु वेड्स मनुसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
-
जिम्मीच्या बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याला प्रेम मिळू शकलेलं नाही. मात्र खऱ्या आयुष्यातील त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये मोहब्बतें चित्रपटाचा मोठा वाटा आहे.
-
-
मोहब्बतें चित्रपटाने जिम्मीची एक चॉकलेट बॉय इमेज तयार केली होती. त्यामुळे तो त्यावेळी लाखो मुलींच्या मनातील ताईत झाला होता. यात त्याची पत्नी प्रियंकाचाही समावेश होता. स्वतः प्रियंका आणि जिम्मी यांनी एका मुलाखतीत याचा उलगडा केला आहे.
-
-
प्रियंका म्हणाले, “मोहब्बतेंचं स्क्रीनिंग सुरु असताना मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की मला जिम्मीशी लग्न करायचं आहे. त्यामुळे आमच्या दोघांसाठी मोहब्बतें चित्रपट खूप खास आहे. त्यामुळेच मला मोहब्बतें चित्रपट सर्वात जास्त आवडतो.
-
-
जिम्मी शेरगिलने बॉलिवुडसह पंजाबी इंडस्ट्रीत देखील नाव कमावलं आहे. जिम्मी डिजीटल प्लॅटफॉर्मवरही आहे. तो ‘यॉर हॉनर’मध्ये दिसला आहे.
-
-
जिम्मी शेरगिल पत्नीसोबत.