Olympic 2024 : यंदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार ‘या’ महिला आमदार, सुवर्ण पदकावर लावणार नेम?
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये महिला खासदाराचाही समावेश आहे. कोण आहेत त्या खासदार जाणून घ्या.
1 / 5
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरूवात झाली आहे. यंदा भारताकडून 117 खेळाडू ऑलिम्पकमध्ये सहभागी झाले आहेत. यंदा भारतीय खेळाडूंमध्ये एका महिला आमदाराचा समावेश आहे. या आमदार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून भाजपच्या श्रेयसी सिंह आहेत.
2 / 5
श्रेयसी सिंह या शुटींगमधील शॉटगन ट्रॅप मध्ये खेळताना दिसणार आहेत. शुटींगमधील हा खेळ 30 जुलै आणि 31 जुलैला होणार आहे. श्रेयसी सिंह यांनी 2020 ली भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. पहिल्याच प्रयत्ना त्यांना यश आलं होतं.
3 / 5
श्रेयसी सिंह या बिहारच्या पहिल्या महिला खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्या होत्या. शुटींगमध्ये श्रेयसी सिंह मोठं नाव आहे.
4 / 5
श्रेयसी सिंहने 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी त्याने 2010 आणि 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
5 / 5
श्रेयसी सिंह यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांच्या कन्या आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कामगिरीकडे सर्वांंचं लक्ष असणार आहे.