अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. नागिन या टीव्ही शोमधून घराघरात आपली छाप पाडणाऱ्या मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही खास स्थान निर्माण केले आहे.
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच, मौनीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लूज-फिटिंग ड्रेस परिधान केलेली दिसून आहे.
मौनी रॉयने लिंबू रंगाच्या लूज ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ही अभिनेत्री प्रेग्नंट आहे की नाही, असा अंदाज युझर्स बांधू लागले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये मौनीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे
मौनी तिच्या बाल्कनीत पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्लूम बेबी ब्लूम.'