सध्या मंगळ ग्रहाविषयी वैज्ञानिकांमध्ये बरंच कुतूहल दिसून येत आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक देशाला या ग्रहावर वेगाने पोहोचण्याची इच्छा आहे.
दरम्यान, गुरुवारी नासाने मंगळ ग्रहाचे काही सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत, जे पाहून लोक त्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहेत.
खरं तर, या फोटोमध्ये निळ्या रंगाचे ठिपके आहेत. त्यामुळे याला ब्लू डूम्स ऑफ मार्स असं म्हटलं जात आहे.
हा फोटो शेअर करताना नासाने "ब्लू डुन्स ऑन रेड प्लॅनेट" असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहे. हे फोटो मंगळावरच्या उत्तर ध्रुवाचे असल्याचं म्हटलं जात आहे. या लाल ग्रहावर वाहणार्या जोरदार वाऱ्यामुळे हे तयार झाले आहेत. मंगळावरील हा परिसर 30 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.