BMW M 1000 RR: बीएमडब्ल्यूची बाइक भारतात लाँच, फिचर्स आणि किमतीसह इतर बाबी समजून घ्या
BMW M 1000 RR: बीएमडब्ल्यूने भारतात BMW M 1000 RR लाँच केली आहे. या गाडीचं बुकिंग सुरु झालं आहे. डिलिव्हरी 4 महिन्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये सुरु होईल. जाणून घ्या बाइकचे फिचर्स आणि किंमत
1 / 5
एम आरआर 999 सीसी कॅपेसिटी असलेली वॉटर कूल्ड इनलाइन 4 सिलेंजर इंजिन असलेली बाइक आहे. यात 212bhp@14,500rpm मॅक्सिमम आउटपुट आणि 113Nm@11,000rpm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. बाइक 3.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग धारण करते. या बाइकचा मॅक्सिमम स्पीड 314 किमी प्रतितास आहे. (फोटो: BMW)
2 / 5
बाइकमध्ये 6.5 इंच टीएफटी इंस्ट्रुमेंट पॅनेल, लाइट वेट एम बॅटरी, रियर युएसबी चार्जिंग सॉकेट, एलईडी लाईट युनिट, इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल आणि हीटेड ग्रिप्स आहे. (फोटो: BMW)
3 / 5
ही बाइक आकर्षक असून थ्रॉटल, इंजिन ब्रेक, ट्रॅक्सन कंट्रोल, व्हीली कंट्रो, एबीएस आणि एबीएस प्रो फीचर्ससह येते. (फोटो: BMW)
4 / 5
ही बाइक कॉम्पिटिशन पॅकेजसह उपलब्ध आहे. एम कॉम्पिटिशन पॅकेजमध्ये माइल्ड पार्ट्स पॅकेज, एम कार्बन पॅकेजमध्ये नॅच्युरल कलर्ड एनोडाइज्ड, 220जी लाइट स्विंग आर्म, डीएलसी कोटेड एम अँड्योरेंज चेन सह येते आणि हंप कव्हरसह पिलियन पॅकेज मिळते. (फोटो: BMW)
5 / 5
बीएमडब्ल्यू M 1000 RR ची एक्स-शोरूम किंमत 49,00,000 रुपये आहे. बीएमडब्ल्यू M 1000 RR कॉम्पेटिशनची एक्स-शोरूम किंमत 55,00,000 रुपये आहे. (फोटो: BMW)