बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख तिचा आगामी चित्रपट 'थर' च्या प्रदर्शनाच्या तयारी आहे. येत्या 6 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने फातिमा मरून रुच्ड कट-आउट ड्रेसमध्ये 'थर'चे प्रमोशन करताना दिसून आली आहे.
या आऊटफिटमध्ये फातिमाने आकर्षक पद्धतीने पोझ देत फोटो शूट केला आहे. क्लोदिंग लाइन डॅश अँड डॉट ब्रँडचा हा ड्रेस असून. त्याची अधिकृत वेबसाइटवर 4,990 रुपये किंमत आहे.
फातिमाने तिचा लूक पंप स्टिलेटोस आणि डायमंड इअररिंगसह स्टाइल कॅरी केली आहे.याबरोबरच कॅमेऱ्यासमोर अनेक हॉट पोझ दिल्या आहेत.
फातिमाने लाल रंगाची नेल पेंट व लाल लिपस्टिक लावत न्यूड मेकअप करून स्वत:ला तयार केले आहे. या विंटेज लूकसाठी, फातिमाने तिच्या केसांचीही खास प्रकारची हेअर स्टाईल केली आहे.