बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही कायमच चर्चेत असते. सुष्मिता सेन ही तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेन ही एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याला परत डेट करत असल्याचे सांगितले जातंय.
आता यावर स्पष्टपणे बोलताना सुष्मिता सेन ही दिलीये. रोहमन शॉल हा सुष्मिता सेन हिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. अभिनेत्री म्हणाली की, मी रोहमन शॉलसोबत रिलेशनमध्ये नाहीये.
माझ्या आयुष्यात कोणताही पुरूष नाहीये. मी गेल्या काही वर्षांपासून सिंगलच आहे. फक्त काही चांगले मित्र माझ्यासोबत सध्या आहेत.
2021 पासून आपण सिंगलच असल्याने तिने म्हटले आहे. रोहमन शॉलसोबत दोन वर्षांपूर्वी सुष्मिता सेनचे ब्रेकअप झाले होते. मात्र, परत ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते.
सुष्मिता सेन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सुष्मिता सेनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.