Bollywood Expensive Cars | बॉलिवूडकरांचे लक्झरी शौक, कोरोना काळातही खरेदी केल्या महागड्या गाड्या!
कोरोनाने कदाचित बॉलिवूड स्टार्सच्या कारकीर्दीतही मोठा ब्रेक आणला असेल, परंतु काही स्टार्सनी ही परिस्थिती संधी म्हणून वापरली. काही बॉलिवूड स्टार्सनी यावर्षी स्वत:साठी अत्यंत महागड्या कार खरेदी केल्या आहेत.
1 / 7
कोरोनाने कदाचित बॉलिवूड स्टार्सच्या कारकीर्दीतही मोठा ब्रेक आणला असेल, परंतु काही स्टार्सनी ही परिस्थिती संधी म्हणून वापरली. काही बॉलिवूड स्टार्सनी यावर्षी स्वत:साठी अत्यंत महागड्या कार खरेदी केल्या आहेत.
2 / 7
अभिनेता कार्तिक आर्यनला यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यावर त्याने ताबडतोब स्वत:साठी एक कार खरेदी केली. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी उरुस ही कार साडेचार कोटींमध्ये खरेदी केली आहे.
3 / 7
प्रभासला सुरुवातीपासूनच लक्झरी कारची आवड आहे. त्याने यावर्षी स्वत:साठी एक सुपर कार विकत घेतली आहे. या अभिनेत्याने नुकतीच लॅम्बोर्गिनी एव्हेंटोडोर रोडस्टर खरेदी केली आहे. या वाहनाची किंमत पाच कोटींपेक्षा जास्त आहे.
4 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आजकाल आपल्या नवीन कारबद्दल चर्चेत आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच स्वत: साठी एक मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी केली आहे. या वाहनाची किंमत 1.62 कोटी आहे.
5 / 7
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने देखील स्वत:साठी एक नवीन खरेदी केली आहे. अर्जुनने लँड रोव्हर डिफेन्डर विकत घेतली आहे.
6 / 7
शाहिद कपूरने देखील स्वत:साठी बीएमडब्ल्यू एक्स 7 एसयूव्ही खरेदी केली. मार्च महिन्यात अभिनेता या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेताना दिसला. ज्यानंतर त्याने आता ही कार खरेदी केली आहे.
7 / 7
यावर्षी पत्नी सुनीता कपूरच्या वाढदिवशी अनिल कपूरने त्यांना एक मर्सिडीज कार भेट दिली आहे. या वाहनाची किंमत 90 लाख असल्याचे सांगितले जात आहे.