Kareena Kapoor Khan | सैफपूर्वी ‘या’ हिरोवर होता करीनाचा जीव, नाव ऐकून व्हाल हैराण
Kareena Kapoor's First Crush : अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. पण आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल अशी गोष्ट सांगणार आहोत, जी तिच्या सर्वात मोठ्या फॅनलाही माहीत नसेल.
-
-
अभिनेता शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफ अली खानचा करीना कपूरच्या आयुष्यात प्रवेश झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. पण तुम्हाला माहीत आहे का की, सैफ आणि शाहिदच्या आधीही करिनाचे मन एका अभिनेत्यावर जडले होते. ज्याने ९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केले. तो कोण आहे ते जाणून घेऊया.. ( Photos : Instagram / kareenakapoorkhan)
-
-
खरंतर एका डान्स रिॲलिटी शोमध्ये आल्यावर करीनाने हा खुलासा केला होता. ९० च्या दशकातल्या एका नायकावर तिचे खूप प्रेम असल्याचे तिने उघड केले होते. तो आजही तिला प्रचंड आवडतो, असं ती म्हणाली.
-
-
‘आशिकी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसणारा हँडसम हिरो राहुल रॉय हा तिचा पहिला क्रश असल्याचे करीनाने सांगितले होते. त्यामुळेच तिने ‘आशिकी’ हा चित्रपट जवळपास 8 वेळा पाहिला.
-
-
आशिकी हा चित्रपट त्या काळातील सुपर-डुपर हिट चित्रपट होता. कथेसोबतच चित्रपटातील गाणीही लोकांना खूप आवडली. आजही या चित्रपटाची गाणी लोकप्रिय आहेत.
-
-
कामाबद्दल बोलायचं झालं तर करीना कपूर शेवटची ‘जाने जान’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील दिसले होते.