Photo Gallery | बहुप्रतीक्षित मर्सिडीज सी-क्लासच्या बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या खासियत
सी-क्लास हे आमच्या पोर्टफोलिओमधील एक महत्त्वाचे उत्पादन आहे आणि आमच्या लक्झरी सेडान ऑफरला आणखी मजबूत करेल. प्रत्येक नवीन पिढीचा विचार लक्षात घेत C-क्लासमध्ये उत्कृष्ट ,आरामदायी , तांत्रिक कौशल्य आणि विकसित डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे.
1 / 5
मर्सिडीज बेंझ - भारतात 2022 सी-क्लास येत्या 10 मे ला लॉन्च करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सी- क्लासला ई- क्लास व टॉप ऑफ द लाईन एस- क्लासच्या जवळ मर्सिडीज अपडेटेड सेडानवर अनेकांनी दावा दाखवला आहे.
2 / 5
ही कार त्याच्या फ्रँचायझी भागीदार नेटवर्कवर आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया ऑनलाइन स्टोअरवर डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध असेल. मर्सिडीज-बेंझच्या नवीन सी-क्लाससाठी बुकिंग रक्कम 50 हजार रुपये आहे, ज्यामध्ये C200 आणि C300d प्रकारांसाठी बुकिंग प्रथम सुरू होते, त्यानंतर C220d प्रकारासाठी बुकिंग सुरू होईल. .
3 / 5
सी-क्लास हे आमच्या पोर्टफोलिओमधील एक महत्त्वाचे उत्पादन आहे आणि आमच्या लक्झरी सेडान ऑफरला आणखी मजबूत करेल. प्रत्येक नवीन पिढीचा विचार लक्षात घेत C-क्लासमध्ये उत्कृष्ट ,आरामदायी , तांत्रिक कौशल्य आणि विकसित डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे. अशी माहिती सीईओ मार्टिन श्वेंक यांनी दिली आहे .
4 / 5
13 ते 30 एप्रिल दरम्यान विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांसाठी एक विशेष बुकिंग विंडो उघण्यात आली आहे. मात्र इतर नवीन संभाव्य खरेदीदारांसाठी 1 मे पासून बुकिंग सुरू होणार आहे.
5 / 5
कंपनीच्या सर्व उत्पादनांना जोरदार मागणी तर आहेच. नवीन सी-क्लास ग्राहकांना भरपूर आकर्षित करेल. या कारचे नवीन डिझाइन, आरामदायी व तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे आहे.