PHOTO | नाद करायचा नाय…! शेतकऱ्याने पिकवला तब्बल 9 किलोंचा मुळा, फोटो एकदा पाहाच
हायकेट शेती आणि संकरित वाणाच्या मदतीने बुलडाण्यातील एका शेतकऱ्याने चांगलीच किमया केली आहे. त्याने आपल्या शेतात चक्क 9 किलोचा मुळा पिकवलाय. (buldhana bhagwan munde 9 kg radish)
1 / 5
हायकेट शेती आणि संकरित वाणाच्या मदतीने बुलडाण्यातील एका शेतकऱ्याने चांगलीच किमया केली आहे. त्याने आपल्या शेतात चक्क 9 किलोचा मुळा पिकवलाय.
2 / 5
भगवान मुंडे असं या शेतकऱ्याचं नाव असून तो बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोत्रा येथील रहिवाशी आहे. या शेतकऱ्याने त्याच्या शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे.
3 / 5
बाजारात विक्री तसेच घरी खाण्यासाठी त्याने भाजीपाल्यासोबतच मुळादेखील लावला आहे. मुंडे यांनी मेहनत घेऊन भाजीपाल्यासह मुळ्याची शेती चांगली फुलवली.
4 / 5
त्यानंतर त्यांनी शेतातील मुळा विक्रीसाठी आणि घरी खाण्यासाठी काढला. मात्र, हा मुळा चक्क 9 किलोंचा निघाल्यामुळे भगवान मुंडे आश्चर्यचिकत झाले.
5 / 5
मुळ्याचा एवढा मोठा आकार बघून गावकऱ्यासह पंचक्रोशीतील इतर शेतकरीसुद्धा अवाक् झाले आहेत. 9 किलो वजनाचा हा मुळा पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.