नांदगाव खंडेश्वरजवळील शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात झाला. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली घुसली. त्यामुळं प्रवासी जखमी झाले.
या अपघातात बस रस्त्याच्या कडेला गेली. त्यामुळं बसचे मोठे नुकसान झाले. बसही चांगलीच चेपकली. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून अमरावतीला जाणाऱ्या बसला अपघात झाला. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.
अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक झाली. यात ट्रकचा समोरचा भाग चांगलाच चेपकला. ट्रकचे बरेच नुकसान झाले.
या अपघातात एसटीमधील अंदाजे 24 प्रवासी जखमी 6 प्रवासी गंभीर आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.