खराब लाईफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण अनेक आजारांच्या गर्तेत सापडतो. त्यापैकीच एक आजार म्हणजे यूरिक ॲसिड वाढणे. यामुळे सांध्यामध्ये वेदना होणे आणि स्नायूंना सूज येणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच किडनीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही आहारात अनेक हेल्दी पेयांचा समावेश करू शकता.
ओव्याचे पाणी - ओव्याचा अनेक पदार्थांमध्ये वापर केला जातो. तुम्ही नियमितपणे ओव्याचे पाणी सेवन करू शकता. त्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 1 चमचा ओवा घालून ते पाणी उकळावे. कोमट झाल्यानंतर ते पाणी प्यावे. यामुळे यूरिक ॲसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरी ज्यूस - स्ट्रॉबेरी हे अतिशय आरोग्यदायी फळ आहे. तसेच ते खूप चविष्टही असते. तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यूसचे सेवन देखील करू शकता. हे वाढलेले यूरिक ॲसिड नियंत्रित करण्याचे काम करते.
लिंबू पाणी - लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि वजन कमी करण्याचे काम करत नाही, तर त्यामुळे युरिक ॲसिडही नियंत्रणात राहते. तुम्ही लिंबू पाण्याचे नियमित सेवन करू शकता.
संत्र्याचा रस - संत्र्याचा रस अतिशय चवदार असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने युरिक ॲसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. तुम्ही संत्र्याचा रस नियमितपणे पिऊ शकता.