प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र आहारात त्याचे सेवन कसे करावे असा प्रश्न शाकाहारी लोकांना पडतो, मांसाहारी लोकांना त्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही शाकाहारी असाल तर या पदार्थांच्या माध्यमातून प्रोटीन्सचे सेवन करू शकता.
डाळी : भारतात बहुतांश सर्व घरांमध्ये डाळींचे सेवन आवर्जून केले जाते. जे लोक मांसाहार करत नाहीत, त्यांनी डाळी आवर्जून खाव्यात, तो प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे.
दुग्धजन्य पदार्थ : दुधापासून दह्यापर्यंत व इतर दुग्धजन्य पदार्थ हे प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. थंडीत दुपारच्या वेळेस दही खाता येऊ शकते.
बीन्स : प्रोटीनचा इनटेक वाढवण्यासाठी शाकाहारी लोकं राजमा, छोले, काळे चणे यांसारखे पदार्थ खाऊ शकतात. यांची भाजी चविष्ट लागते व प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असून खूप हेल्दी असतात.
नट आणि बिया: जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर तुम्हाला प्रोटीन्सचा इनटेक वाढवणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही काजू, बदाम, बेदाणे यांसारखे पदार्थ एका मर्यादेत खाऊ शकता. याशिवाय चिया सीड्ससारख्या बियांचे सेवनही फायदेशीर ठरू शकते.