परभणी : दुष्काळात तेरावा याप्रमाणेच काहीशी वेळ जिल्ह्यातील वाघाळा शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामातील पीके धोक्यात आहेत. असे असतानाच पाथरीत जायकवाडी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या बी 59 या मुख्य कॅनॉलच भराव पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच शिवाय पाणी शेतशिवारात घुसल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. कॅनॉलचे पाणी शेतामध्ये जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे.