Marathi News Photo gallery Celebrating gudi padwa the tradition that has been going on for hundreds of years continues unabated today
Nashik Gudhi padwa | गीन-गौरीचा जयघोष, त्याला गरब्याची साथ, शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही अखंडितपणे सुरू
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2022). यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.
1 / 5
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2022). यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
2 / 5
गुढीपाडवा हे पर्व महाराष्ट्रासोबतच गोवा आणि केरळातही हा सण साजरा केला जातो. या भागांमध्ये हा दिवस ‘संवत्सर पडवो’ या नावानं ओळखला जातो. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.
3 / 5
याच पार्श्वभूमीवर येवला शहरात गीन गौर उत्सवाला सुरुवात झाली असून गुढीपाडवा सणानिमित्त 16 दिवस हा उत्सव चालत असून होळी नंतर येणाऱ्या सप्तमी पासून या उत्सवास सुरुवात होते तर गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या तृतीयेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
4 / 5
गीन-गौर एक प्रकारे शंकर-पार्वतीची प्रतीक असून उत्सवानिमित्त स्त्रियांच्या डोक्यावर रंगीत घडे , त्यावर महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आल्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिरात त्यानंतर स्त्रिया गरबा खेळतात. अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे.
5 / 5
पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.