Constitution Day | ठाकरेंकडून उद्देशिकेचे सामूहिक वाचन तर दरेकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, संविधान दिन उत्साहात
राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांनी आज संविधान दिवस साजरा केला. (celebration Constitution Day | politicians)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
Follow us on
‘संविधान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ते मुख्यमंत्री असताना 2010मध्ये गुजरातमध्ये काढलेल्या ‘संविधान रॅली’चा फोटो ट्विटरवर शेअर केला. यावेळी त्यांनी देशावासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रालयात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संविधान दिनानिमित्त नागपूरमधील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी प्रविण दरेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.