Chanakya Niti : काहीही होऊ दे; पत्नी ‘या’ 5 गोष्टी कायम आपल्या पतीपासून लपवणार म्हणजे लपवणारच
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये समाजाला मार्गदर्शन मिळेल अशा विचारांचा संग्रह केला आहे. या ग्रथांमध्ये पत्नीबाबत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य पुढे म्हणतात जी स्त्री आपल्या गुणांनी आणि साहसाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते ती स्त्री राष्ट्राला एक नवी दिशा देते. अशी स्त्री ही कौतुकास पात्र असते. राष्ट्राच्या विकासात तिचं योगदान असतं.
Follow us on
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.
चाणक्य यांनी सांगितलेले विचार आजही जीवनाच्या विविध टप्प्यांवर समाजाला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये चाणक्य असं म्हणतात की अशा काही गोष्टी असतात ज्या महिला आपल्या पतीला कधीच सांगत नाहीत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
चाणक्य यांच्या अनुसार महिला आपल्या पूर्व प्रियकराविषयी आपल्या पतीला कधीच सांगत नाही, कारण आपल्यापूर्वी आपल्या पत्नीच्या आयुष्यात कोणी तरी होतं ही कल्पना देखील पुरुष सहन करू शकत नाही असं चाणक्य म्हणतात.
चाणक्य म्हणतात की स्त्रीयांना घरची लक्ष्मी म्हणतात. ती आपल्याकडे आलेल्या पैशांमधून काही पैशांची बचत करते आणि पती आर्थिक संकटात सापडला तर त्याला मदत करते. मात्र इतर वेळी ती आपण बचत केलेल्या पैशांबाबत कधीही आपल्या पतीला सांगत नाही.
पत्नीला आपल्या पतीसोबत कसा रोमान्स करायचा आहे, तीला काय हवं आहे याबाबत असलेली तिची इच्छा ती कधीही पतीला सांगत नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जर पत्नीची तब्येत खराब असेल, तीला काही छोटा- मोठा आजार असेल तर अशावेळी पत्नी त्याकडे दुर्लक्ष करते, कारण पतीवर अधिक आर्थिक भार टाकण्याची तिची इच्छा नसते.
आर्य चाणक्य सांगतात की महिलांना देखील काही पुरुष आवडतात, त्या त्यांना मनाने पसंत करतात. मात्र त्याबाबत आपल्या पतीला कधीही सांगत नाहीत.