Chanakya Niti | सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा

| Updated on: Mar 30, 2022 | 8:00 AM

आजच्या काळात ती सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

2 / 5
अतिराग- रागामुळे माणसाचे सर्वात जास्त नुकसान होते. जर पती-पत्नीपैकी कोणीही रागीट स्वभावाचे असेल तर जीवनात कधीही शांती येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत संघर्षाची परिस्थिती निर्माण होते आणि वैवाहिक जीवन कमकुवत होते. अशा स्थितीत तुमच्या रागावर संयम ठेवावा. रागामुळे तुमच्या हातात आलेल्या गोष्टी तुम्ही हरवून बसाल.

3 / 5
गुपित- जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर तुमची गुपिते स्वतःकडेच ठेवणे चांगले. जर तुमच्या गोष्टींमध्ये तुम्ही तिसरी व्यक्ती ठेवली तर तुमच्यातील समस्या सोडवण्याऐवजी समस्या अजूनच कठीण होऊन बसेल. त्याच प्रमाणे तुमच्या मित्रांची गुपितं तुम्ही तुमच्या जवळच ठेवा.

4 / 5
 खोटे बोलणे- पती-पत्नीचे नाते फार नाजूक असते. यामध्ये खोट्याचा अवलंब करू नये. कालांतराने तुमचे सत्य बाहेर आले तर जोडीदाराचा विश्वास संपुष्टात येईल आणि तुमच्या नात्यात कटुता येऊ लागेल. तुमच्या नात्यामध्ये परदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा. कोणतेही नाते विश्वासावर आधारीत असते. विश्वास नसेल तर कोणतेच नाते जास्त काळासाठी टिकू शकत नाही .

5 / 5
खर्च- उत्पन्नानुसार पती-पत्नी दोघांनीही खर्चाचा समतोल राखला पाहिजे. तुमच्या खर्चाचा हिशेब नसला तरी पती-पत्नीमध्ये संघर्षाची परिस्थिती नक्कीच निर्माण होईल. तुमची बचत हा तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळचा मित्र आहे.