निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने जीवनात यश मिळू शकते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मान-सन्मान मिळविण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
खोटे बोलू नका - आचार्य चाणक्य यांच्यामते व्यक्तीने कधीही खोटे बोलू नये. बरेच लोक इतरांशी खोटे बोलून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. असे करणे चुकीचे आहे. यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होते. त्यामुळे कधीही खोटे बोलू नका.
वाईट वागू नका - अनेकांना अशी सवय असते की ते इतरांचे वाईट करतात. ते कोणाचे सुख पाहू शकत नाहीत. ते इतरांच्या यशाने त्रस्त असतात. म्हणूनच ते इतरांचे वाईट करून स्वतःला शांत करतात. अशा लोकांचा कोणी आदर करत नाही. त्यामुळे हे करणे टाळा.
नम्र व्हा - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीचा स्वभाव नम्र असावा. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. माणसाच्या स्वभावात नम्रता असेल तर समाजात त्याचा मान-सन्मान वाढतो. अशा व्यक्तीला जीवनात यश मिळते.
लोभ - आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने लोभी नसावे. जे फसवणूक करून पैसे कमावतात, त्यांना मान मिळत नाही. पैसा नेहमी मेहनत करूनच मिळवला पाहिजे. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. त्यामुळे लोभ टाळावा.