चिपळूण शहर व परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.
वशिष्ठी नदीला पूर आल्याने पाणी दुथडी भरून वाहत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.
शहरात एनडीआरएफचं पथक रात्री दाखल झालं असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चिपळूण मध्ये ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पावसामुळे कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून दरड काढण्याचे काम सुरू आहे.