बॉलिवूमडध्ये सध्या एका नव्या जोडीची जोरात चर्चा सुरू आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे. ते बऱ्याच वेळेसे एकत्र वेळ घालवताना, सुट्टी एन्जॉय करताना दिसले आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून आहे. (Pic Credit: ananyapanday/Insta)
एवढंच नव्हे तर स्पेनमध्ये सुट्टी घालवल्यानंतर अनन्या आणि आदित्य भारतात एकत्र दिसले होते. मात्र या कपलने अद्याप काही अधिकृत भाष्य केलेले नाही.
अनन्या पांडेचे पिता आणि अभिनेता चंकी पांडे यांना अनन्या व आदित्यच्या नात्याबाबत नुकताच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की, ग्लॅमर इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतात. तुम्ही ते थांबवू शकत नाही.
त्याशिवाय अनन्या हिची ऑनस्क्रीन जोडी टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यनसोबत चांगली दिसते, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडबाबत काय सल्ला दिला, हेही त्यांनी सांगितले.
तुमचा बॉयफ्रेंड कोणीही असो, पण तो तुमच्यापेक्षा चांगला, उत्तम व्यक्ती असावा, तुमच्यापेक्षा कमी व्यक्तीचा (आयुष्यात) काही चान्स नाही, असे चंकी यांनी त्यांच्या मुलींना सांगितले होते.