अभिषेकचं ऐश्वर्या नाही, तर या अभिनेत्रीशी होणार होतं लग्न, साखरपुडाही झाला होता, मात्र नंतर….
Abhishek Bachchan and Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. ज्युनिअर बच्चन आणि मिस वर्ल्ड या दोघांची जोडी जमलीच नसती, कारण अभिषेक बच्चनचा आघाडीच्या अभिनेत्रीसह साखरपूडा झाला होता. मात्र तो साखरपूडा एका अटीमुळे मोडला. त्यानंतर मिस वर्ल्ड बच्चन कुटुंबियांची सून झाली.
1 / 8
'मिस वर्ल्ड' ऐश्वर्या राय आणि ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन हे दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. दोघांचा गेल्या अनेक वर्षांचा सुखी संसार मोडणार असल्याची चर्चा काही महिन्यापासून आहे. मात्र अभिषेकचं लग्न ऐश्वर्याऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीसह होणार होतं. अभिषेक बच्चन आणि त्या अभिनेत्रीचा साखरपुडाही झाला होता. मात्र नक्की काय घडलं ज्यामुळे लग्न होऊ शकलं नाही? ती अभिनेत्री कोण? जाणून घेऊयात.
2 / 8
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांनी लग्नाच्या दिशेने एक पाऊल टाकलं होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता.मात्र नको तेच झालं आणि साखरपुडा मोडला. नक्की काय झालं होतं? हे सविस्तर समजून घेऊयात.
3 / 8
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांनी एकमेकांना जवळपास 5 वर्ष डेट केलं. करिश्माला अभिषेक बॉलिवूडमधील डेब्यूआधीपासूनच आवडायचा.
4 / 8
करिश्मा आणि अभिषेक या दोघांनी 5 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर नात्यात पुढे जायचं ठरवलं. या दोघांच्या निमित्ताने बॉलिवूडमधील दिग्गज घराणं असलेलं कपूर आणि बच्चन एकत्र आले होते. करिश्मा आणि अभिषेक आणि दोघांचा 2002 साली साखरपूडा झाला. सर्व आनंदी होते. मात्र दोघांचा विवाह काही होऊ शकला नाही. दोघांचा साखरपूडा मोडला.
5 / 8
अभिषेक आणि करिश्मा या दोघांचा साखरपूडा मोडण्याला जया बच्चन कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माने लग्नानंतर अभिनय क्षेत्र सोडायला हवं, अशी इच्छा जया बच्चन यांची होती. मात्र कपूर कुटुंबिय आणि करिश्माला ही अट मान्य नव्हती.
6 / 8
अभिषेक आणि करिश्मा दोघांनी अखेरीस 'मैने भी प्यार किया' या सिनेमात अभिनय केला होता. सुनील दर्शन हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. सुनील दर्शन यांनी मीडियासह बोलताना अभिषेक आणि करिश्माच्या ब्रेकअपबाबत खुलासा केला होता.
7 / 8
"दोघांचं नातं हे खरंखुरं होतं. दोघेही लग्न करणार होते. मी साखरपुड्याला गेलो होतो. मात्र दोघेही एकत्र काम करायचे तेव्हा भांडायचे. ते दोघेही मेड फॉर इच अदर या पठडीतले नव्हते, कायमच भांडायचे. हे खरंच एकमेकांसाठी बनले आहेत का? असा मी विचार करायचो. दोघेही चांगले आहेत, मात्र दोघांच्या नशिबात दुसरंच काही होतं", सुनील दर्शन यांनी म्हटलं होतं.
8 / 8
अभिषेकने साखरपूडा मोडल्यानंतर ऐश्वर्या रायला डेट केलं. दोघांनी 'कुछ ना कहो' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर 'गुरु'सिनेमातून दोघांच्या लव्ह स्टोरीने आकार घेतला, दोघांते सूर जुळले. त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर 2007 साली दोघांचा विवाह झाला. मात्र सध्या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.