‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका रंजक वळणावर; अक्षरा देणार प्रेमाची कबुली…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actor Hrishikesh Shelar And Shivani Rangole Photos : तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अक्षरा अधिपतीला आपल्या मनातील भावना सांगणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. पुढे काय घडणार?वाचा सविस्तर...
1 / 5
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका चांगलीच लोकप्रिय ठरते आहे. या मालिकेतीस पात्र प्रेक्षकांना भावतात. आता ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.
2 / 5
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत एक नवा ट्रॅक पाहायला मिळतो आहे. अक्षराला प्रेमाची जाणिव झाली आहे. आता अक्षरा तिच्या मनातील गोष्ट अधिपतीला सांगणार आहे.
3 / 5
अक्षरा अधिपतीच्या प्रेमात पडली आहे आणि ही गोष्ट अक्षराला अधिपतीला सांगायची आहे. मात्र त्यात अडथळे येताना दिसता. याचा एक प्रोमो सध्या चर्चेत आहे.
4 / 5
'तुला शिकवीन चांगलाच धडा' चा एक प्रोमो रिलीज झाला आहे. अक्षरा अधिपतीला प्रेमाची कबुली द्यायला जाते. ती अधिपतीला तिच्या मनातील गोष्ट सांगायला जाते. मात्र तितक्यात अधिपतीला कुणीतरी आवाज देतं. त्यामुळे अक्षराचं बोलणं अर्धवट राहातं.
5 / 5
अक्षरा आणि अधिपती ही जोडी सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील हे कपल प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. आता ही मालिका नव्या वळणावर आली आहे.