तू वाइल्ड कार्ड म्हणून आलास पण…; रितेश देशमुखने संग्रामला सुनावलं
Riteish Deshmukh angry on Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी' चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतो आहे. सतत 'बिग बॉस मराठी'च्या घरात काही ना काही घडत असतं. बिघडत असतं. भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने संग्राम चौगुलेचा क्लास घेतला आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री अर्थात बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेची झाली. घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. त्यावरून 'बिग बॉस मराठी'चा होस्ट रितेश देशमुखने त्याला सुनावलं आहे.
2 / 5
वाइल्ड कार्ड असणारा सदस्याला बिग बॉसचा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन या आठवड्यात तरी प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही.
3 / 5
संग्राम चौगुलेचा गेम दिसत नसल्याने रितेशने त्याचा क्लास घेतला आहे. संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. पण 'बिग बॉस'च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात. पण सध्या तुम्ही दिसतच नाही आहात, असं रितेश भाऊ म्हणाला.
4 / 5
महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा. 'बिग बॉस मराठी'च्या या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेले आहात, असं म्हणत रितेशने संग्रामला सुनावलं आहे.
5 / 5
रितेशने क्लास घेतल्यानंतर संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार? संग्रामच्या नव्या गेम प्लॅनचा निक्की आणि अरबाजवर काय परिणाम होईल? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहेत.