मतदार यादीतून नाव गायब, सुयश टिळक भडकला; म्हणाला, 7 वाजता मतदानाला पोहोचलो पण…
Actor Suyash Tilak on Pune Loksabha Election 2024 Voting : मतदार यादी नावाच नसल्याने अभिनेता सुयश टिळक भडकला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यात त्याने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सुयश टिळक या पोस्टमध्ये काय म्हणाला? वाचा सविस्तर...
गेली अनेक वर्षे मी न चुकता मतदान करत आलो आहे. यावेळी मला तो मतदानाचा हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायानेदेखील मतदान करू दिलं गेलं नाही. याची खंत वाटत राहील, असा उल्लेख सुयशने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
Follow us on
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झालं. मात्र मतदार यादीत नावच नसल्याने काही मतदारांना मतदानाच्या हल्लापासून वंचित राहावं लागलं. यात अभिनेता सुयश टिळक याचाही समावेश आहे.
अभिनेता सुयश टिळक मतदानासाठी मतदान केंद्रावर गेला. मात्र मतदार यादीत त्याचं नावच नसल्याने त्याला मतदान करता आलं नाही. सुयश टिळक याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
गेल्यावेळी मतदान केलं. तेव्हा नावात चूक असल्याचं आढळलं. नावात असलेली चूक सुधारण्यासाठी अर्ज केला. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडलं. मात्र त्यात ती चूक तशीच होती, असं सुयश म्हणाला.
सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावर पोहोचलो. ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं. म्हणून मग तीन वेगवेगळ्या बूथवर जात नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण मग कळलं की यावेळी काहीजणांचा मतदारसंघच बदललाय. मग वेगळ्या मतदारसंघातही शोधाशोध केली, असं सुयशने सांगितलं.
गेली अनेक वर्षे मी न चुकता मतदान करत आलो आहे. यावेळी मला तो मतदानाचा हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायानेदेखील मतदान करू दिलं गेलं नाही. याची खंत वाटत राहील, असा उल्लेख सुयशने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.