वर्ल्डकप विजयानंतर काका राहुल द्रविडसाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट
Actress Aditi Dravid Post For Rahul Dravid : मराठी अभिनेत्री आदिती द्रविड हिने एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आदितीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
1 / 5
भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 17 वर्षांनंतर भारताने टी 20 वर्ल्डकप जिंकला. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री आदिती द्रविड हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
2 / 5
माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करत आदिती द्रविडने अभिनंदन केलं आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणावरही आदितीने भाष्य केलं आहे.
3 / 5
थँक्यू कोच... तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. त्याचमुळे हा असा चांगला शेवट पाहायला मिळाला.... हा असाच निरोप तुमच्यासाठी योग्य होता अन् तो झाला. तुमच्यासारखं कुणीही नाही. खूप आदर आणि प्रेम अशी पोस्ट, अशी पोस्ट आदितीने लिहिली आहे.
4 / 5
राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळली आणि 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्डकप जिंकून आणला. टी 20 वर्ल्डकप संपताच राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे.
5 / 5
राहुल द्रविड हे आदिती द्रविडचे चुलते आहेत. आदिती द्रविड ही मराठी अभिनेत्री आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने काम केलं आहे. 'यू अँड मी' हे तिचं गाणं काही दिवसांआधी आलं होतं. 'मन पाखरावानी' हा तिचा म्युझिक अल्बम देखील रिलिज झाला आहे.