अश्विनी भावेंच्या क्लासी लूकची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी म्हणाले, तुमचं वय…
Actress Ashvini Bhave Photos : अभिनेत्री अश्विनी भावे यांनी खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी अश्विनी यांच्या फोटोंना पसंती दिली आहे. कमेंट करत अश्विनी यांच्या लूकला दाद दिलीय. वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री अश्विनी भावे या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.
2 / 5
ब्लू कलरच्या आऊटफिटमधील हे फोटो अश्विनी भावे यांनी शेअर केले आहेत. घरत गणपती हा त्यांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या प्रोमोशन इव्हेंटला अश्विनी यांनी हा लूक केला होता.
3 / 5
अश्विनी भावे यांच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या फोटोला दाद दिलीय. तुम्ही आजही अगदी तरूण आणि सुंदर दिसता. तुमचं वय जाणवतच नाही, अशी कमेंट चाहत्याने केली आहे.
4 / 5
ब्लॅक कलरच्या या आऊटफिटमधील फोटोही अश्विनी यांनी शेअर केले होते. ब्लॅक कलरच्या या क्लासी आऊटफिटमधील फोटोंनाही नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. खूपच सुंदर दिसत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
5 / 5
अश्विनी भावे यांचा साडीतील हा खास लूक.... 'घरत गणपती' हा त्यांचा सिनेमा येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत अश्विनी भावे दिसणार आहेत.