अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही गौरीने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर खास फोटो शेअर केलेत.
गौरी कुलकर्णीने मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरात खास फोटोशूट केलं आहे. पावसात तिने हे खास फोटो काढले आहेत. 'फूल in wonderland!' म्हणत गौरीने हे फोटो शेअर केलेत.
गौरीच्या या खास फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. गौरी तू खूपच सुंदर दिसत आहेस. तुझी छत्री पण छान आहे. ही छत्री नेमकी कुठून घेतलीस? असा प्रश्न नेटकऱ्यांनी गौरीला विचारला आहे.
गौरीने हे आणखी काही खास फोटो शेअर केले आहेत. मांजरीसोबतच्या या फोटोंनाही नेटकऱ्यांना पसंती दिलीय. क्युट मांजर, तुझं गोड हसू आणि दिसतीयेस पण सुंदर..., अशी कमेंट गौरीच्या चाहत्याने केलीय.
'आई कुठे काय करते' या मालिकेत गौरीने काम केलंय. या मालिकेतील गौरी या साकारलेल्या पात्राने तिला ओळख दिली. सध्या ती सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतून प्रेक्षकांट्या भेटीला येत आहे.