सुट्टीच्या दिवशी प्राजक्ता माळी काय करते?; म्हणाली, मी सलग…

| Updated on: Oct 19, 2024 | 3:10 PM

Prajakta Mali Daily Routine : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. डेली रूटिन कसं असतं? सुट्टीच्या दिवशी काय करते? याबद्दल प्राजक्ताने सांगितलं आहे. फुलवंती सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ता काय म्हणाली? वाचा सविस्तर...

1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा 'फुलवंती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी प्राजक्ता महाराष्ट्रभर फिरते आहे. ठिकठिकाणी तिच्या मुलाखती होत आहे.

2 / 5
'फुलवंती' सिनेमाच्या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने तिचं डेली रूटिन सांगितलं आहे. बाहेर कुठे जायचं नसेल तर घरी असताना काय करते? यावर प्राजक्ता बोलती झाली आहे.

3 / 5
सुट्टीच्या दिवशी मी खूप चित्रपट पाहाते. कुठल्याही भाषेतील सिनेमे मी सलग पाहू शकते. मी एका दिवसात चारही सिनेमे पाहू शकते. एक वेबसिरीज मी एका दिवसात संपवू शकते, असं प्राजक्ताने म्हटलं.

4 / 5
सुट्टीच्या दिवशी वाचन मी करते. माझा निश्चय आहे की झोपताना किमान एक तरी पान वाचायचं. पण एकदा वाचायला लागले की मग 20- 25 पानं होतात. मला वाचायची आवड आहे. ते वाचन मी सुट्टीच्या दिवशी करते, असं प्राजक्ता म्हणाली.

5 / 5
मेडिटेशन मला करायला आवडतं. ते मी सुट्टीच्या दिवशी करते. पद्म साधना नावाचं मेडिटेशन आहे. जे करायला अडीच तास लागतात तर ते मी इतर दिवशी करू शकत नाही. हे सगळं मी माझ्या सुट्टीच्या दिवशी करते, असं प्राजक्ताने सांगितलं.