प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात
Actress Prajakta Mali and Gashmeer Mahajani in Bigg Boss : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज नवे पाहुणे येणार आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर बातमी...
1 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात आज कल्ला करायला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लाडका डॉ. निलेश साबळे येणार आहे. तसंच अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी हे मराठी सिनेसृष्टी गाजवणारे कलाकारदेखील 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार आहेत.
2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फुलवंती' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ता आणि गश्मीर 'बिग बॉस मराठी'च्या घरात आले आहेत.
3 / 5
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी सदस्यांना भेटायला येणार आहेत. सदस्यांना ते फाशांच्या तालावर नाचवणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज धम्माल असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक प्राजक्ता आणि गश्मीरसोबत मजा- मस्ती करताना दिसणार आहेत.
4 / 5
बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये, फाशांच्या तालावर या टास्कची एक झलक पाहायला मिळत आहे. या टास्कमध्ये एक मजेदार ट्विस्टदेखील येणार आहे. गाणं लागल्यानंतर समोरील प्रॉपर्टी घेऊन सदस्यांना डान्स करायचा आहे. त्यांचा धमाल डान्स पाहताना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चांगलीच मेजवानी असणार आहे.
5 / 5
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'बिग बॉस'नेदेखील 'फुलवंती' चित्रपटाला हाऊसफुल शुभेच्छा दिल्या आहेत. वीकेंड स्पेशल आजचा भाग विशेष असणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एकापेक्षा एक धमाके पाहायला मिळणार आहेत.