बावनकशी सोनं, निखळ सौंदर्य…; प्राजक्ता माळीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती
Prajakta Mali Post About Phullwanti : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा फुलवंती हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ता माळी हिने काही फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. वाचा सविस्तर बातमी...
1 / 5
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नृत्याविष्काराने नटलेला 'फुलवंती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या‘फुलवंती’ कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.
2 / 5
समर्पण आणि शृंगार... 'फुलवंती'मधील शेवटचं नृत्य..., असं म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. जलवंती, लजवंती दरवळते मी कस्तुरी.....फुलवंती. बावन कशी सोनं.. निखळ सौंदर्य.. फुलवंती..., असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
3 / 5
तुझ्या तेज तसाच जसा लौकिक प्राजक्तांचा पुष्पांचा, जसा एका मोकळ्या अंगणात प्राजक्ताच्या पुष्पांनी बहार येतो. तसाच बहार परद्यावर फुलवंती रुपी प्राजक्ताने सुद्धा दाखवलेला आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
4 / 5
खूप खूप सुंदर सिनेमा... प्राजक्ताचा डान्स आणि सौंदर्य बघण्यासाठी तरी हा मूव्ही बघायलाच हवा...नक्की बघा, अशीही कमेंट प्राजक्ताच्या पोस्टवर पाहायला मिळत आहे.
5 / 5
मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय कारण फुलवंती हा पहिला चित्रपट आहे जो मी चित्रपटगृहात दोनदा जाऊन पाहिला आणि दुसऱ्यावेळेस तर एकटीने जाऊन पाहिला. हे तिकीट मी जपून ठेवणारे कायम. ही अप्रतिम कलाकृती घडवून आणल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. सगळ्यांनी खूप छान काम केलंय. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ राहिल कायम!, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे.