असा साजरा केला ‘फुलवंती’ने तिचा वाढदिवस; प्राजक्ता माळीची स्वप्नपूर्ती
Prajakta Mali Birthday Celebration : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा वाढदिवस झाला. या तिने घरच्या लोकांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे. पाहा फोटो.....
1 / 5
8 ऑगस्टला अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा वाढदिवस झाला. तिने तिचा 35 वा वाढदिवस दिमाखात साजरा केला. प्राजक्ता यंदाचा वाढदिवस खूप खास होता. कारण या दिवशीच प्राजक्ताने तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली.
2 / 5
'फुलवंती' या सिनेमाची प्राजक्ताने तिच्या वाढदिवशी घोषणा केली. येत्या 11 ऑक्टोबरला 'फुलवंती' हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्राजक्ताचा यंदाचा वाढदिवस फुलवंतीमय साजरा झाला.
3 / 5
बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेत. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. तसाच हा स्वप्नपूर्तीचा सिनेमा आहे, असं प्राजक्ताने म्हटलं आहे. कुटुंबियांसोबत प्राजक्ताने तिचा वाढदिवस साजरा केला.
4 / 5
तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं मी करू शकले नसते. माझ्या वाढदिवशी प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल माझे सर्व चाहते, कलाकार आणि मित्रांचे आभार... इंडस्ट्रीत माझा गॉडफादर नाही. पण माझ्याकडे तुम्ही सर्व रसिक मायबाप आहात, असं प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
5 / 5
'फुलवंती' हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मी निर्माता म्हणून नवीन इनिंग सुरू करत आहे. नेहमीप्रमाणे या कलाकृतीवरही प्रेम करत राहा, असं प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे.