‘प्राजक्तराज’ने गाठला महत्वाचा टप्पा; प्राजक्ता माळी म्हणाली…
Actress Prajaktta Mali PrajaktaRaj first Jwellery partnership with Nach ga Ghuma Movie : प्राजक्ता माळीच्या ज्वेलरी ब्रँडने महत्वाचा टप्पा गाठला आहे. प्राजक्ता माळीने याबाबत एक महत्वाची पोस्ट शेअर केलीय. प्राजक्ता या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली आहे? वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँड आहे. 'प्राजक्तराज' अस्सल मराठमोळे अलंकारासाठी प्रसिद्ध आहे.
2 / 5
मागच्या वर्षी प्राजक्ताने हा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. आता 'प्राजक्तराज'ने महत्वाचा टप्पा पार केला आहे. याबाबत प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर केली आहे.
3 / 5
प्राजक्तराजने First Jwellery Partnership मराठी सिनेमासोबत केली आहे. 'नाच गं घुमा' या सिनेमासोबत प्राजक्तराजने Jwellery partnership केली आहे.
4 / 5
अत्यंत दर्जेदार कलाकृतीबरोबर 'प्राजक्तराज' जोडलं गेलं. याचा आत्यंतिक आनंद, समाधान आणि अभिमान आहे, असं म्हणत प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केलीय.
5 / 5
प्राजक्ता माळीने प्राजक्तराज नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. या माध्यमातून पारंपरिक मराठमोळे दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. प्राजक्ताच्या या व्यवसायाने आता महत्वाचा टप्पा गाठला आहे.