मैत्रिणीने दिलेल्या सल्ल्याने बदललं प्राजक्ता माळीचं आयुष्य; घेतला मोठा निर्णय

| Updated on: Dec 09, 2024 | 10:40 AM

Actress Prajkta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. एका मैत्रिणीने प्राजक्ताला सल्ला दिला. त्यानंतर प्राजक्ताचं आयुष्य बदललं. प्राजक्ताने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. प्राजक्ताने तिचा अनुभव शेअर केला आहे. वाचा सविस्तर...

1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या गोष्टीवर तिची मतं स्पष्टपणे आणि ठामपणे मांडत असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यास तुम्ही स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकता, असं प्राजक्ताने सांगितलं. एका मैत्रिणीने दिलेला सल्ला आणि त्यानंतर केलेल्या बदलावर एका मुलाखतीत प्राजक्ता बोलती झाली.

2 / 5
2014 ला जेव्हा मी 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका करत होते. मधुगंधा कुलकर्णी माझ्याबरोबर त्या मालिकेत होती. तिने मला एक सल्ला दिला होता. तो मी काम लक्षात ठेवला आहे, असं प्राजक्ताने सांगितलं आहे.

3 / 5
तिने तेव्हाच मला सांगितलेलं ती प्राजक्ता तू खूप स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेस आणि तुला स्वतंत्र आयुष्य जगायला आवडणार आहे, हे मी तुला आताच सांगते. तुला जर स्वत: चे निर्णय स्वत: चे घ्यायचे असतील. दुसऱ्यांनी तुझ्यावर निर्णय लादणं चालणार नसेल. तर तुला लवकरात लवकर तुझ्या पायावर उभं राहावं लागेल, असं प्राजक्ताने सांगितलं.

4 / 5
आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल. तुला तुझं स्वत: चं घर, गाडी घ्यावं लागेल आणि बँकेत किमान 10 लाख रुपये ठेवावे लागतील. त्यामुळे तू स्वत: चे निर्णय स्वत: घेऊ शकशील, असं प्राजक्ता या मुलाखतीत म्हणाली.

5 / 5
जर तू हे नाही केलं तर तुला दुसऱ्यांचं आयुष्यभर ऐकावं लागेल. ते माझ्या डोक्यात फिट बसलं. तेव्हाच मी ठरवलं की मला नाही दुसऱ्यांना निर्णय घेऊ द्यायचे. किंवा जगण्यासाठी आता पैसै कमवायचेत. रोजच्या खाण्यापिण्यासाठी पैसे कमवावे लागतायेत, असं मला नको होतं. त्यामुळे तेव्हाच मी ठरवलं होतं की मला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे, असं प्राजक्ता म्हणाली.