प्रिया बापटला आवडतो उमेश कामतच्या हातचा चहा; पाहा फक्कड चहाची सिक्रेट रेसिपी…
Actress Priya Bapat and Umesh Kamat Tea Secret Recipe : प्रिया बापट आणि उमेश कामत हे कायम चर्चेत असणारं कपल आहे. या दोघांची सिनेविश्वासह सोशल मीडियावर चर्चा असते. प्रियाला उमेशच्या हातचा चहा आवडतो. फक्कड चहाची सिक्रेट रेसिपी वाचा अन् एकदा बनवून बघा...
1 / 5
मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीची केमेस्ट्री अनेकांना भावते. या दोघांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. प्रिया बापटच्या दिवसाची सुरूवात उमेशने बनवलेल्या चहापासून होते.
2 / 5
सकाळी पहिला चहा उमेश करतो. तो चहा प्रियाला प्रचंड आवडतो. या फक्कड चहाची रेसिपी उमेशने एका मुलाखती दरम्यान सांगितली. ही रेसिपी काय आहे? पाहूयात...
3 / 5
पाणी गरम करायचं मग त्यात आलं किसून टाकायचं. त्याला छान उकळून घ्यायचं. मग त्यात दूध टाकायचं. थोडी साखर टाका. मग त्याला उकळी आली की त्यात चहा पावडर टाकायची. त्यावर झाकण ठेवा अन् मिनिटाभरात चहा सर्व्हल करा...
4 / 5
प्रियानेच मला तिच्या पद्धतीचा चहा बनवायला शिकवलं आहे. तिनं सांगितल्या प्रमाणेच मी चहा करतो. तिला तो आवडतो. ती एकमेव गोष्ट मला चांगली बनवता येते, असं उमेशने सांगितलं. चहाची ही सिक्रेट रेसिपी तुम्हीही जरूर ट्राय करा.
5 / 5
प्रिया आणि उमेश हे मराठी सिने रसिकांचं आवडतं कपल. या दोघांचे सिनेमा प्रेक्षकांना आवडतात. तसंच यांच्या नाटकालाही लोक गर्दी करतात. या दोघांनी केमेस्ट्री दाखवणारे हे खास फोटो...