मराठी सिनेमात का दिसत नाही?; प्रिया बापट म्हणाली, मागच्या काही वर्षांपासून…
Actress Priya Bapat About Her Career : अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या करिअरवर भाष्य केलं. मराठी सिनेमे, तिला येणाऱ्या ऑफर्स यावर प्रिया बापट एका मुलाखतीत बोलली आहे. उमेश कामतसोबतच्या आगामी सिनेमाबाबतही तिने प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर.....
1 / 5
अभिनेत्री प्रिया बापट ही मराठीसोबतच हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये विविध भूमिका साकारताना दिसते. पण सध्या मराठी सिनेमांमध्ये प्रिया फारशी दिसत नाही. यावर एका मुलाखतीत प्रियाने तिचं मत मांडलं.
2 / 5
2018 नंतर आजपर्यंत मला एकाही मराठी सिनेमाची ऑफर आलेली नाही. 'आम्ही दोघी' हा माझा सिनेमा 2018 ला आला होता. तो माझा शेवटचा मराठी सिनेमा. मला या सिनेमानंतर एकाही मराठी सिनेमाची ऑफर आलेली नाही. मला विचारण्यातच आलेलं नाही, असं प्रियाने या मुलाखतीत सांगितलं.
3 / 5
उमेश कामतसोबत एका सिनेमात काम करण्याविषयी मला विचारण्यात आलं. त्यात मी काम केलं. तो सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो कधी येणार ते माहिती नाही. पण या व्यतिरिक्त मला विचारलंच गेलं नाहीये, अशी खंत प्रियाने बोलून दाखवली.
4 / 5
जर प्रेक्षकांना मला मराठी सिनेमात बघायचंय. तर मग मराठी लेखक दिग्दर्शकांनाही वाटलं पाहिजे की त्यांना मला मराठी सिनेमात बघायचंय. तर त्यांनी मला सिनेमासाठी विचारलं पाहिजे, असं प्रिया म्हणाली.
5 / 5
मला सिनेमासाठी विचारण्यातच आलेलं नाही. माझ्याकडे सिनेमा आलेलाच नाही तर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. असं अजिबातच नाही की मला मराठीत काम करायचंच नाही. कारण मी मराठी नाटकात काम करतंच आहे, असंही प्रिया म्हणाली.