रिंकू राजगुरुने खरेदी केली पहिली कार; म्हणाली, ही भावनाच वेगळी आहे…

| Updated on: Jul 28, 2024 | 8:05 PM

Actress Rinku Rajguru buy First Car :अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने तिची पहिली कार खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर रिंकूने हे फोटो शेअर केलेत. पहिली कार खरेदी करण्याचा आनंदच वेगळा असतो, असं म्हणत रिंकूने ही आनंदाची बाब तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पाहा फोटो...

1 / 5
 सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने पहिली कार खरेदी केली आहे. याबाबतची पोस्ट रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

2 / 5
कोणतीही पहिली गोष्ट नेहमीच खास असते. तुम्ही तुमची स्वतःची पहिली कार खरेदी करता तेव्हा एक वेगळीच भावना असते. तर, हे माझं नवीन प्रेम, असं म्हणत रिंकूने नव्या कारचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

3 / 5
रिंकूने तिच्या कमाईतून पहिली कार खरेदी केली आहे. पांढऱ्या रंगाची लक्झरी कार रिंकूने खरेदी केली आहे. तिने तिच्या या नव्या कारसोबत खास फोटोशूट केलं आहे.

4 / 5
रिंकूने सोशल मीडियावर ही बाब शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. सिनेसृष्टीतील तिच्या सहकाऱ्यांनी आणि तिच्या हितचिंतकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी कमेंट करत तिचा शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
 सैराट या सिनेमातून रिंकू महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. रिंकूने साकारलेली आर्ची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिंकूचा मोठा चाहता वर्ग आहे.