नव्या घरात ‘दिवाळी पहाट’; मित्र- मैत्रिणींसोबत सई ताम्हणकरने साजरी केली दिवाळी
Actress Sai Tamhankar Home Diwali Pahat : अभिनेत्री सई ताम्हणकर... सईच्या घरी दिवाळीचं खास सेलिब्रेशन झालं, सईच्या नव्या घरात दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. या खास कार्यक्रमासाठी सईने तिच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना बोलावलं होतं. वाचा सविस्तर...
1 / 5
दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरा केला गेला. सगळीकडे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. सेलिब्रिटींच्या घरी देखील दिवाळीची उत्साह पाहायला मिळतोय. अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही दिवाळी साजरी केलीय.
2 / 5
सईने तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणी आणि घरच्या सोबत दिवाळी पहाट साजरी केली. तिच्या खास जागी म्हणजे 'द इलेव्हेंथ प्लेस' अर्थात तिचं घर. इथे तिने दिवाळी पहाट साजरी केली. यासाठी तिचे खास मित्र घरी आले होते.
3 / 5
दिवाळीनिमित्त तिच्या 'द इलेव्हेंथ प्लेस' या मुंबईतील घरी 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. गेल्यावर्षीपासून सई या घरी राहायला आली आहे. गेल्यावर्षीच्या दिवाळीमध्येही तिने खास दिवाळी पहाटसाठी सांगितिक मेजवानी आयोजित केली होती. यंदाही 'दिवाळी पहाट' आयोजित करण्यात आली होती.
4 / 5
या दिवाळी पहाटला सईची आई मृणालिनी ताम्हणकर उपस्थित होत्या. याशिवाय सईच्या 'मानवत मर्डर्स' ची टीम दिग्दर्शक आशिष बेंडे, अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग आणि यांच्यासह अभिनेत्रीच्या जवळची इतरही काही कलाकार मंडळी उपस्थित होते.
5 / 5
दिवाळी पहाट कार्यक्रमात यावेळी लोकप्रिय सतारवादक मेहताब अली नियाझी उपस्थित होते. तर त्यांना तबला वादनासाठी खुर्रम अली नियाझी यांची साथ मिळाली. सईने सोशल मीडियावर या दिवाळी पहाटचे खास फोटो शेयर केले आहेत. तिच्या मित्रमैत्रिणींनीही सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.